Mahesh Gaikwad
आपल्याकडे रताळे प्रामुख्याने उपवासाला खाण्यासाठी परिचित आहेत. रताळे हे एक कंदमुळ असून याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
रताळे खाणे ह्रदय आणि पोटाच्या समस्यांसाठी नैसर्गिक औषध मानले जाते. वेगवेगळ्या पध्दतीने तुम्ही याचे सेवन करू शकता.
रताळ्यामध्ये फायबरसह व्हिटामिन-ए, सी या सारखी जीवनसत्त्वे असतात. तसेच पोटॅशियम, आयर्न या सारखे पोषक तत्त्वही असतात.
रताळ्यामध्ये फायबर घटक भरपूर प्रमाणाक असतो, ज्यामुळे पचन सुधारते, बध्दकोष्ठतेपासून आराम मिळतो.
रताळ्याचे सेवन केल्यामुळे आतडे स्वच्छ होतात आणि पचनक्रिया मजबूत होते.
रताळ्यामधील स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला उर्जा मिळते. सकाळच्या नाश्त्यामध्ये खाणे उत्तम.
रताळे व्हिटामिन-ए ने समृध्द असतात. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तसचे कमजोर नजरही सुधारण्यास मदत होते.
जर नियमित रताळ्याचे सेवन केले तर, स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत होते.