Anuradha Vipat
एक वाटी हिरवे मूग भिजत घालून ते सकाळी खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात.
चला तर मग आज आपण पाहूयात दररोज सकाळी एक वाटी भिजवलेले मूग खाण्याचे फायदे.
हिरवे मूग खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
हिरवे मूग रक्तदाब कमी करण्यास मदत करतात
हिरवे मूग पोटात गॅस जमा होण्यास प्रतिबंध करतात.
मोड आलेले हिरवे मूग हे पचायला सोपे आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी उत्तम आहे.
अशक्तपणा टाळण्यासाठी दररोज हिरव्या मुगाचे सेवन करावे.