Anuradha Vipat
लहान मुलांना चांदीचे दागिने घालण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे.
चांदीचे दागिने घालण्यामागे केवळ सौंदर्य नसून अनेक आरोग्यदायी आणि वैज्ञानिक कारणे आहेत.
चांदीचे दागिने लहान मुलांच्या त्वचेच्या संपर्कात राहिल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषली जाते आणि शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.
मुलांची त्वचा अतिशय संवेदनशील असते. चांदीचे दागिने संसर्ग आणि बॅक्टेरियापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात.
चांदी घातल्याने मुलांचे मन शांत राहते, चिडचिड कमी होते आणि त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते.
चांदीचा रक्तवाहिन्यांवर हलका दाब पडतो. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
चांदीच्या धातूचा स्पर्श सतत होत राहिल्याने मुलांच्या हाडांना मजबूती मिळते.