Anuradha Vipat
चवीला आंबट-तिखट लागणारी ही कच्ची कैरी केवळ जिभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे.
कैरीचे पन्हे किंवा कच्ची कैरी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते.
कैरीमध्ये असलेले फायबर आणि आम्ल पचनक्रियेला गती देतात.
यात व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते.
कच्ची कैरी खाल्ल्याने पित्त रसाचा स्त्राव वाढतो, ज्यामुळे यकृताचे कार्य सुधारते.
व्हिटॅमिन सी मुळे हिरड्यांमधून रक्त येणे थांबते आणि दात मजबूत होतात.
यात असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार होते आणि उन्हाळ्यातील पिंपल्सचा त्रास कमी होतो.