sandeep Shirguppe
वरई भगरमध्ये फायबर, प्रथिने, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह आणि व्हिटॅमिन सी असल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते.
वरईमध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटचे प्रमाण खूप कमी असते. कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयविकार आजाराचा धोका कमी होतो.
वरई भगरमध्ये फायबर बद्धकोष्ठता, अपचन, गॅस दूर होण्यास मदत होते. हा भात सहज पचतो. त्यामुळे पोट निरोगी राहते.
कॅलरीज खूप कमी असतात. फायबर भरपूर असते. चयापचय लवकर होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
कॅल्शिअम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. हाडे दुखण्यापासून आराम मिळतो.
वरई भगर लिपीड प्रोफाइल सुधारते. त्यामुळे तांदळ्या भाताऐवजी भगरभाताचा आहारात समावेश केल्यास मधुमेह रुग्णांना फायदेशीर ठरते.
शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे केवळ उपवासाऐवजी इतरवेळीही भगरचा आहारात समावेश केल्यास फायदा होतो.
वरई भगर बहूगुणी असल्याने केवळ उपवासावेळी नव्हे, तर दैनंदिन आहारातही भगरीचा समावेश असावा.