Anuradha Vipat
बेदाणे हे सुक्या मेव्यातील अत्यंत पौष्टिक फळ असून ते आरोग्यासाठी अमृतासमान मानले जातात.
रात्री बेदाणे पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
नियमित बेदाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊन ॲनिमियाचा धोका टळतो.
बेदाण्यांमध्ये कॅल्शिअम आणि बोरोन हे घटक असतात, जे हाडांच्या मजबूतीसाठी प्रभावी ठरतात.
यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून संसर्गापासून संरक्षण करतात.
बेदाण्यांमध्ये पोटॅशिअम भरपूर असते, जे शरीरातील सोडिअमचे प्रमाण कमी करून उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
बेदाण्यांमध्ये नैसर्गिक शर्करा असते, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.