Anuradha Vipat
गरम पदार्थ किंवा चहा-कॉफी घेतल्यानंतर लगेच गार पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत अयोग्य आहे.
गरम पदार्थामुळे दातांचे 'एनॅमल' प्रसरण पावते आणि त्यावर लगेच गार पाणी टाकल्यास ते आकुंचन पावते. यामुळे दातांमध्ये खळबळ निर्माण होते आणि दात कमकुवत होतात.
गरम आणि थंड अशा विरुद्ध तापमानाचा एकाच वेळी शरीराशी संपर्क आल्यास घशात जळजळ होऊ शकते.
गरम जेवणानंतर गार पाणी पिल्याने पोटातील जठराग्नी मंदावते. यामुळे अन्न नीट पचत नाही.
अचानक गरम आणि थंडावा यामुळे शरीराची अंतर्गत तापमान नियंत्रण प्रणाली गोंधळते.
गरम पदार्थ खाल्ल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटांनी पाणी प्यावे.
गरम पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी नेहमी कोमट किंवा साध्या तापमानाचे असावे.