Anuradha Vipat
मुळा आरोग्यासाठी खरोखरच एक वरदान आहे.मुळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत.
हिवाळ्याच्या काळात मुळा सहज उपलब्ध होतो. आज आपण मुळा खाण्याचे निरोगी आरोग्यासाठी असणारे फायदे जाणून घेऊयात.
मुळा बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
मुळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.
मुळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात.
मुळा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
मुळ्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.