sandeep Shirguppe
एक डाळिंब खाऊन तुम्हाला शंभर फायदे मिळतात असं अनेकवेळा तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
वैज्ञानीक दृष्ट्या डाळिंबाचे नियमित सेवन केले तर उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते, हृदयविकाराचा धोका कमी होतो.
डाळिंबामुळे पचन आणि स्मरणशक्तीसह रक्तातील लोहाची प्रमाण वाढवते. यामुळे उन्हाळ्यात डाळींब खाण्याचा सल्ला दिला जातो.
डाळिंब उन्हाळ्यात शरिराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. एवढेच नाही तर शरीरातील कोरडेपणा दूर करण्यातही ते पटाईत आहे.
डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल सारखी संयुगे असतात जी मेंदूतील संरक्षणात्मक प्रभाव वाढवतात.
२५० ग्रॅम डाळिंब १५० कॅलरी, ३८ ग्रॅम कर्बोदके, ११ ग्रॅम फायबर, २६ ग्रॅम साखर, २ ग्रॅम प्रथिने, यासह अनेक घटक असतात.
डाळिंबात ellagitannins आणि punicalagins नावाची संयुगे असतात ज्यात कर्करोग विरोधी गुणधर्म असतात.
एका अभ्यासानुसार, डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स मेंदूमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होऊ देत नाहीत.