Pear Health Benefit : आयुर्वेदीक गुणधर्मांनी परिपूर्ण नासपती ; आरोग्यासाठी आहेत बंपर फायदे

Mahesh Gaikwad

नासपती फळ

नासपती हे एक हंगामी फळ आहे. पायरस पायरीफोलिया असे याचे वैज्ञानिक नाव आहे. यालाच इंग्रजीमध्ये पिअर असेही म्हणतात.

Pear Health Benefit | Agrowon

पिअर फळ

नासपतीच्या फळाचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. कारण या फळामध्ये भरपूर प्रमाणात आयुर्वेदीक गुणधर्म आढळतात.

Pear Health Benefit | Agrowon

औषधी गुणधर्म

नासपतीमध्ये विटामीन-सी, विटामीन-बी कॉम्प्लेक्स, खनिज, पोटॅशिअम फोलेट, फायबर, कॉपर, मँगनीज यासारखे औषधी घटक असतात.

Pear Health Benefit | Agrowon

कोलॅस्ट्रॉल नियंत्रण

या फळात फायबरचे अधिकांश प्रमाण पेक्टीनच्या स्वरूपात असते, जे कोलॅस्ट्रॉल कमी करणे आणि ह्र्दय रोगाचा धोका कमी करण्यासाठी मदत करते.

Pear Health Benefit | Agrowon

हाडांची मजबूती

नासपतीमध्ये कॅलरीजचे प्रमाणही भरपूर असते, ज्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. तसेच हाडांच्या मजबूतीसाठीही नासपती फायदेशीर मानले जाते.

Pear Health Benefit | Agrowon

हिमोग्लोबीनची कमतरता

नासपती फळ लोहाचा चांगला स्त्रोत असल्याने ज्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबीनची कमी असते अशांनी याचे सेवन करावे. हे फळ अॅनिमियाच्या समस्येसाठीही फायदेशीर आहे.

Pear Health Benefit | Agrowon

पचनक्रिया सुधारते

या फळात फायबरचे प्रमाण उत्तम असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पचनाच्या संबंधित समस्यांसाठी याचा फायदा होतो.

Pear Health Benefit | Agrowon