Anuradha Vipat
सेंद्रिय अन्न खाण्याचा मुख्य फायदा म्हणजे शरीरात हानिकारक रसायने आणि कीटकनाशकांचा प्रवेश रोखला जातो.
सेंद्रिय शेतीमध्ये कृत्रिम खते किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नसल्याने हे अन्न आरोग्यासाठी अधिक सुरक्षित मानले जाते.
सेंद्रिय फळे आणि भाज्यांमध्ये शरीराला रोगप्रतिकारक बनवणारे अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात.
यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी आवश्यक खनिजे अधिक प्रमाणात आढळतात.
सेंद्रिय मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कृत्रिम हार्मोन्स किंवा अँटीबायोटिक्सचा वापर केला जात नाही.
सेंद्रिय दूध आणि मांसामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे प्रमाण सुमारे ५०% जास्त असते, जे हृदयासाठी उत्तम आहे.
नैसर्गिकरीत्या पिकवले गेल्यामुळे सेंद्रिय अन्नपदार्थांची चव ताजी आणि अस्सल असते.