Anuradha Vipat
कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत असले तरी, त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे थक्क करणारे आहेत.
कांद्यामध्ये असणारी पोषक तत्वे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.
कांद्यामध्ये क्रोमियम आणि सल्फर असते, यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
कांद्यातील विशिष्ट घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास साहाय्यक ठरतात.
कांद्यामध्ये फायबर आणि 'प्रीबायोटिक्स' मुबलक असतात, जे पचन संस्था निरोगी ठेवतात.
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते आणि 'लू' लागण्यापासून संरक्षण मिळते.