Anuradha Vipat
भेंडीचे पाणी हे आरोग्यासाठी एक उत्तम नैसर्गिक टॉनिक मानले जाते.
अनेक पोषक तत्वांनी भरपूर असलेले हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास त्याचे शरीराला जबरदस्त फायदे मिळतात.
भेंडीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मोठी मदत होते.
भेंडीत फायबरचे प्रमाण भरपूर असते. या पाण्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास कमी होतो.
हे पाणी प्यायल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही, ज्यामुळे अतिरिक्त खाणे टाळले जाते आणि वजन कमी करणे सोपे होते.
भेंडीमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे.
भेंडीचे पाणी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.