Aslam Abdul Shanedivan
कडुलिंबाच्या झाडाचा प्रत्येक भाग हा औषधी गुणधर्मांनी भरलेला असतो. याबरोबरच कडुलिंबाचे आणखी फायदे जाणून घेऊया.
कडुलिंबाचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. त्याची साल, पाने, डहाळ्या या सर्वांचा औषधी उपयोग होतो
कडुलिंबाचा वापर विशेषत: त्वचेच्या आजारांमध्ये केला जातो. खाज सुटणे, दाद किंवा त्वचेशी संबंधित इतर आजारांवर कडुलिंबाचे तेल कारगर ठरते
आपल्या घराच्या परिसरात कडुलिंबाचे झाड असने फार फायद्याचे असते. याच्या पानांच्या धुरामुळे डास नाहीसे होतात. तर वातावरणही शुद्ध राहते.
कडुलिंबाचा वापर हा औषधी असून त्याची मऊ साल चघळल्याने पचनास मदत होते.
कडुलिंबाची पाने सुकवून दाण्यांमध्ये ठेवल्यास कीटक आत जात नाहीत आणि त्यामुळे धान्य खराब होत नाही.
कडुलिंबाच्या पानांचा रस रक्त शुद्ध करतो आणि रक्त देखील वाढवतो, दररोज ५ ते १० मिली या प्रमाणात सेवन केल्यास याचा लवकर परिणाम दिसून येतो