sandeep Shirguppe
आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त गवती चहाचे आरोग्याला होणारे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेऊयात.
चहामध्ये आलं किंवा गवती चहा घातला की चहाला छान चव येते आणि असा चहा आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो.
रिकाम्या पोटी गवती चहा घातलेला चहा प्यायल्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात.
गवती चहामध्ये मोठ्या प्रमाणात झिंक, मॅग्नेशिअम, तांबे, पोटॅशिअम, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शिअम असतात.
गवती चहामध्ये असलेले सायट्रलचा वापर हा दीर्घकाळापासून लठ्ठपणाला प्रतिबंध करण्यासाठी केला जातो.
गवती चहामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरिअल तसेच, अँटीइंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात.
गवती चहामध्ये अँटीडिप्रेसंटचे गुणधर्म चिंता आणि नैराश्याच्या लक्षणांपासून मुक्त करू शकतात.
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुमच्या आहारात गवती चहाचा अवश्य समावेश करा.