Deepak Bhandigare
भेंडीच्या भाजीत व्हिटॅमिन ए आणि सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारखी आवश्यक पोषक तत्त्वे असून एकूणच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे
भेंडीत असलेले फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहू शकते
भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून ते पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, तसेच फायदेशीर जिवाणूंना पोषण देऊन आतडे निरोगी राहते
भेंडीमध्ये पॉलीफेनॉल आणि फायबरसारखी संयुगे असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहून मधुमेहाचा धोका असलेल्या लोकांसाठी या भाजीचे सेवन उपयुक्त ठरते
भेंडीतील उच्च फायबरमुळे अधिक वेळ पोट भरल्यासारखे राहते आणि अतिखाणे टाळता येते, यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते
भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ते एक अँटिऑक्सिडंट असल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करते आणि रोग आणि संसर्गांपासून शरीराला संरक्षण मिळण्यास मदत होते
भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे
भेंडीत व्हिटॅमिन ए आणि सी याच्यासह अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्वचा निरोगी राहते, यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होऊ शकतात