Anuradha Vipat
पावसाळ्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील जंगलांमध्ये आणि डोंगराळ भागात नैसर्गिकरी्या उगवणाऱ्या 'कुळू' आणि 'शेवळा' या रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानल्या जातात.
शेवळा ही भाजी दिसायला सुरणासारखी आणि कोंबाच्या स्वरूपात असते. ही भाजी चवीला अत्यंत चवदार आणि आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते.
शेवळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाचा त्रास दूर होऊन पचनसंस्था साफ राहते.
या रानभाजीमध्ये लोहाचे प्रमाण उत्तम असते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि रक्ताची कमतरता दूर होते.
शेवळ्याची भाजी खाल्ल्याने पोटातील जंत मरतात आणि मूत्रमार्गाचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.
कुळू ही प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी कोवळी पालेभाजी आहे. आदिवासी बांधवांमध्ये या भाजीला मोठे औषधी महत्त्व आहे.
या भाजीमध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी हा उत्तम आहार आहे.