Anuradha Vipat
जांभूळ हे केवळ एक चविष्ट फळ नाही, तर ते आयुर्वेदातील एक शक्तिशाली 'सुपरफूड' आहे.
उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारे हे फळ आरोग्यासाठी अक्षरशः वरदान ठरते.
जांभळामध्ये 'जांबोलिन' नावाचे घटक असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
जांभळामध्ये पाचक गुणधर्म असतात. गॅस, अपचन किंवा पोटाच्या इतर समस्यांवर जांभूळ खाणे फायदेशीर ठरते.
जांभूळ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.
यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते, जे हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते .
जांभळाच्या पानामधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे हिरड्यांचे दुखणे आणि दातांमधील जंतू दूर होण्यास मदत होते