Anuradha Vipat
तोंडली ही फळभाजी अनेकांना कदाचित आवडत नसेल, पण आरोग्याच्या दृष्टीने ती अत्यंत गुणकारी आहे.
तोंडलीमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जास्त असते. यामुळे लवकर भूक लागत नाही.
फायबरचे प्रमाण चांगले असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पचन संस्था सुरळीत चालते.
तोंडलीमध्ये पोटॅशियम असते जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
यात असलेल्या व्हिटॅमिन 'सी' आणि 'ए' मुळे शरीराची संसर्गजन्य आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.