Mahesh Gaikwad
गुळवेल ही आयुर्वेदातील अनन्य साधारण महत्त्व असणारी महतत्वाची वनस्पती आहे. आयुर्वेदीक उपचारांमध्ये गुळवेल प्रभावी काम करते.
गुळवेलातील अनेक औषधी गुणधर्मांमुळे हे अनेक आजारांवर रामबाण म्हणून वापरले जाते.
डेंग्यू. चिकुन गुनिया, फ्लू, स्वाईन फ्लू या सारख्या आजारांमध्ये गुळवेल अत्यंत गुणकारी मानले जाते.
तसेच गुळवेलाच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते. वारंवार आजारी पडणाऱ्यांसाठी गुळवेलीचे सेवन अत्यंत गुणकारी आहे.
गुळवेलीमुळे मधुमेहाने ग्रस्त रुग्णांच्या रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यास मदत होते.
गुळवेल रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि रक्त शर्करेचे प्रमाण कमी करते. ताप, तहान, जळजळ, वात यावरही गुळवेळी फायदेशीर आहे.
गुळवेलीच्या सेवनामुळे भूक लागते. अन्न पचन चांगले होते. आजारी व्यक्तीचा अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते.