Deepak Bhandigare
हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते, जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. तसेच यामुळे सर्दी, खोकला आणि विविध संसर्गांपासून संरक्षण मिळू शकते
हिरव्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते
हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी असल्याने त्या वजन कमी करण्यास मदत करू शकतात, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आहारात सॅलड, भाज्या अथवा सूपचा समावेश करा
हिरव्या भाज्यांमध्ये फोलेट भरपूर प्रमाणात आढळते, जे ताण आणि चिंता कमी करून तुमचा मूड सुधारण्यास मदत करते
हिरव्या भाज्यांतील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते आणि कोलन कॅन्सरचा धोका कमी करण्यासही मदत करु शकते
ब्रोकोली सारख्या हिरव्या भाजीत हाडांची घनता टिकवून ठेवणे आणि झीज होण्यापासून संरक्षण करणारी पोषक तत्त्वे असतात, यामुळे हाडे आणि सांधे मजबूत राहण्यास मदत होते
हिरव्या भाज्यांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि एकूणच हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य निरोगी राहते
मेथी सारख्या हिरव्या भाजीत लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज यांसारखी खनिजे तसेच व्हिटॅमिन बी६, प्रथिने आणि डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असतात; त्यामुळे ही भाजी आरोग्यदायी मानली जाते