Mahesh Gaikwad
लसूण हे एक मसाला वर्गीय पीक आहे. भारतातील सगळ्याच घरांमध्ये स्वयंपाकात वापरला जातो.
जेवणाची चव वाढविण्याबरोबरच लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. लसणामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात.
लसणाच्या सेवनामुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढते, ज्यामुळे अनेक आजार आणि संसर्गाचा धोका टाळता येतो.
लसणाचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
लसूण व्हिटामिन 'बी' आणि 'सी' चा उत्तम स्त्रोत असल्याने पचायपचयासाठी उपयुक्त आहे.
लसूण कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तातील लिपिड लेवल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते.
याशिवाय सकाळी उपाशीपोटी लसणाची एक पाकळी चावून खाल्ल्याने मधुमेहाच्या समस्येपासून आराम मिळतो.
लसूणमध्ये अॅलिसिन नावाचे कंपाऊंड असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.