Anuradha Vipat
फळांच्या साली फेकून देण्यापूर्वी त्यांचे हे आरोग्यदायी फायदे नक्की जाणून घ्या.
साल काढून पेरू खाल्ल्याने त्यातील महत्त्वाचे जीवनसत्त्वे वाया जातात, त्यामुळे पेरू नेहमी सालीसह खावा.
अनेक फळांच्या सालींमध्ये गर असलेल्या भागापेक्षा जास्त पोषक तत्वे असतात.
सफरचंदाच्या सालीमध्ये 'क्वेर्सेटिन' नावाचे अँटी-ऑक्सिडंट असते, जे फुफ्फुसे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम असते.
संत्र्याची साल वाळवून त्याची पावडर चेहऱ्यासाठी वापरल्यास त्वचा उजळते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते.
केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि ल्युटीन असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
डाळिंबाची साल हृदयविकारांपासून संरक्षण करते आणि घसा खवखवत असल्यास रामबाण उपाय ठरते. याची पावडर चहामध्ये किंवा कोमट पाण्यासोबत घेता येते.