Foxtail Millet : राळ्याचा भात खा आरोग्य वाढवा

Team Agrowon

राळा हे गवतवर्गीय कुळातील  तृणधान्य पीक  आहे. या पिकाची धान्य तसेच चारा म्हणून आशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडात लागवड केली जाते.

Foxtail Millet | Agrowon

स्वपरागीभवन, कमी पक्वता कालावधी आणि सी-चार वर्गीय तृणधान्य हे प्रमुख गुणधर्म आहेत.

Foxtail Millet | Agrowon

आपल्या देशात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यात राळ्याची लागवड केली जाते.

Foxtail Millet | Agrowon

राळा हे अत्यंत पौष्टिक तृणधान्य आहे. यामध्ये कॅल्शिअम, लोह आणि जीवनसत्त्व ब मोठ्या प्रमाणात आहे. हे ग्लूटेन मुक्त आणि कॅलरी कमी आहे.

Foxtail Millet | Agrowon

लोह आणि कॅल्शियमचा चांगला पुरवठा असल्याने हाडे, स्नायूंचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त. लोहाच्या कमतरतेमुळे कमकुवत स्नायू, अशक्तपणा येतो.

Foxtail Millet | Agrowon

ठिसूळ हाडे, जळजळ आणि ऑस्टिओपोरोसिस,संधिवात, स्पॉन्डिलायटिस यासारख्या हाडांशी संबंधित आजारात शरीराच्या कॅल्शिअम आणि फॉस्फरसच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित आहारात राळ्याचा समावेश करावा.

Foxtail Millet | Agrowon

मधुमेही  रुग्णांना सामान्यतः तांदळाचे सेवन कमी करण्यास सांगितले जाते. राळा पिकाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५०.८ वर आहे.

Foxtail Millet | Agrowon