Anuradha Vipat
मेथीची भाजी ही चवीला किंचित कडू असली तरी ती औषधी गुणांचा खजिना आहे. आयुर्वेदातही मेथीला आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले गेले आहे.
मेथीमध्ये 'गॅलक्टोमनन' नावाचा घटक असतो, जो रक्तात साखर शोषण्याचा वेग कमी करतो. यामुळे डायबेटिस नियंत्रणात राहतो.
मेथीमधील पोटॅशियम आणि फायबर शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदयविकाराचा धोका कमी होतो.
मेथीमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे बद्धकोष्टता, गॅस, अपचन आणि पोटातील जळजळ या समस्या दूर होऊन आतड्यांचे आरोग्य सुधारते.
मेथीच्या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण उत्तम असते. नियमित मेथी खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिन वाढते आणि ॲनिमियाचा त्रास दूर होतो.
मेथीची भाजी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे अतिखाणे टळते आणि वजन नियंत्रित राहते.
मेथीमध्ये कॅल्शियम आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे वाढत्या वयातील सांधेदुखी, वात आणि हाडांचा कमकुवतपणा दूर होतो