sandeep Shirguppe
नारळाला भारतीय संस्कृतीत महत्वाचे स्थान असल्याने नारळाने आरोग्य आणि संस्कृती जपण्याचे दोन्ही काम होते.
रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी नारळाचे पाणी पिण्याचे सांगितले जाते.
अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-फंगल गुणधर्म आतील ओल्या खोबऱ्यातून मिळतात.
नारळ खाल्ल्याने शरीराला तांबे, सेलेनियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त मिळते.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, दररोज जर तुम्ही खोबरे खाल्ले तर तुमचे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
ओले खोबरे खाल्ल्याने केस रेशमी आणि मुलायम होतात. याच्या वापराने त्वचेवर चमक येते.
बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये फायबरयुक्त आहार घेतल्यास पोटाला आराम मिळतो. अशा परिस्थितीत नारळाचे सेवन फायद्याचे आहे.
नारळाच्या सेवनाने शरीराला अँटीव्हायरल गुणधर्म मिळतात. यामुळे शरीरातील इन्फेक्शन्स दूर होतात.