sandeep Shirguppe
सध्या उन्हाळा सुरू झाल्याने डोकेदुखीचा त्रास वारंवार जाणवतो. परंतु यावर आयुर्वेदिक उपाय आहे.
डोकेदुखी कमी करण्यासाठी तुळशीचे पाने औषध म्हणून प्रभावी ठरेल.
तुळशीची पाने डोकेदुखीच नाहीतर इतर अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरते.
तुळशीची पाने दाहक-विरोधी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत.
तुळशीमध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने याचा चहा डोकेदुखीवर आरामदायी ठरेल.
चहा बनवण्यासाठी, एक कप पाण्यात तुळशीची पाने उकळून लिंबू घालून सेवन करा. यामुळे डोकेदुखी कमी होईल.
तुळशीचा काढा बनवण्यासाठी तुळस, आलं आणि दालचिनीचा वापर करावा. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.
तणाव आणि थकवा कमी करण्यासाठी रोज सकाळी ४-५ ताजी तुळशीची पाने चावा. यामुळे तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल.