sandeep Shirguppe
सोयाबीन खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. मधुमेह, वजन, कॅन्सरवर याचे फायदे होतात.
उच्च रक्तदाबाशी संबंधित काही आरोग्य समस्या असतील तर अशावेळी सोयाबीन खाणे चांगले असते.
सोयाबीन रोज खाल्ल्याने शरीर मजबूत होते. तसेच हृदयरोगाचा धोका कमी होतो.
नियमीत सोयाबीन खाल्ल्याने मानसिक संतुलन योग्य राखण्यासाठी मदत करतो.
हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठी सोयाबीन खाणे गरजेचे आहे. अशा रूग्णांसाठी डॉक्टरही सल्ला देतात.
आहारात सोयाबीनचा समावेश केल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडे कमकुवत होण्याचा धोका टाळता येतो.
सोयाबीनचे ताक प्यायल्याने पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते. मात्र असे करताना थोडेसे ताक पिऊन पाहा.
गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सोयाबीनचा वापर करावा.