sandeep Shirguppe
उपवासात राजगिरा खाण्याला खूप महत्व दिले जाते. राजगिराचे अनेक पदार्थ केले जातात. याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत.
राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, फायबर, प्रोटीन आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळतात.
राजगिरा खाऊन तुम्ही प्रोटीनची कमतरता पूर्ण करू शकता. हा प्रोटिनचा चांगला स्रोत आहे.
हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम जबाबदार आहे. दुसरीकडे राजगिरामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी राजगिऱ्याचे सेवन करावे, यामध्ये झिंकते प्रमाण भरपूर आहे.
राजगिरात फायबरचे प्रमाण असते. फायबर पचनसंस्था मजबूत करण्यासोबतच वजन नियंत्रित ठेवण्याचे काम करू शकते.
राजगिरा डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर दृष्टी काम करत असेल तर तुम्ही राजगिरा खाण्यास सुरुवात करा.
राजगिरामध्ये लाइसिन असल्याने केस गळण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच सिस्टिनमुळे केस निरोगी राहण्यास मदत होते.
राजगिरा बियांमध्ये फायटोस्टेरॉल असते जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.