sandeep Shirguppe
अननस हे फळ डिसेंबर महिन्यापासून बाजारात मोठ्या प्रमाणात मिळण्यास सुरू होते. या फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
अननस हे फळ चविष्ट तर आहेच पण त्यात भरपूर पोषकही घटक असल्याने आरोग्याला अनेक फायदेशीर ठरू शकतात.
अननस केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवत नाही तर पचनासाठीही याचा उपयोग होतो.
अननसाचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. हे फळ पाणीदार असल्याने पाण्याची वाढवण्यास मदत होते.
अननस खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि शरीर निरोगी राहते. यामध्ये असलेले कॅल्शियम स्नायूंच्या दुखण्यापासून आराम देते.
फायबर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. लठ्ठपणापासूनही आराम मिळतो.
अननस खाल्ल्याने वजन कमी होण्यासोबतच पोटाची चरबीही झपाट्याने कमी होते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच ते मेटाबॉलिज्म वाढवते.
अननसमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढवून मौसमी आजारांचा धोका कमी करते.
अननस हे आंबट-गोड आणि रसाळ फळ आहे. याचे जास्त प्रमाणात सेवन करणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
अननसाच्या रसामध्ये ब्रोमेलेन, एन्झाईम्सचा असते शरिरात होणारी जळजळ कमी करण्यास मदत करू शकते.