Anuradha Vipat
वेळेवर जेवण करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते, त्यामुळे तुमच्या सोयीनुसार जेवणाची वेळ निश्चित करावी.
वेळेवर जेवल्याने जास्त खाणे टाळता येते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
रात्रीचे जेवण लवकर केल्याने पचन सुधारते आणि चांगली झोप लागते.
रात्रीचे जेवण लवकर केल्याने ॲसिडिटी आणि ॲसिड रिफ्लक्स सारख्या समस्या टाळता येतात.
नियमित जेवणाने मूड सुधारतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
नियमित वेळेवर जेवल्याने पचनक्रिया सुधारते आणि अन्न व्यवस्थित पचते.
वेळेवर जेवल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते, ज्यामुळे अचानक भूक लागणे आणि जास्त खाणे टाळता येते.