sandeep Shirguppe
नाचणीचे आपल्या आहारात अनन्य साधारण महत्व आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि फायबर यांसारखे पोषक घटक असतात.
कॅल्शियम आणि फॉस्फरसचे नाचणीमध्ये अधिक प्रमाण असल्याने दात आणि हाडांना याचा फायदा होतो.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासाठी आपल्या आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश करावा.
नाचणीमध्ये फायबर आणि प्रथिने जास्त असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
ज्यांना पोटाचे विकार आहेत त्यांनी नाचणीच्या भाकरीचे सेवन केल्यास आराम मिळतो.
नाचणीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात.