Deepak Bhandigare
आंबा खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते, त्यात असलेले व्हिटॅमिन सी, फायबर हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते
आंब्याचे सेवन केल्याने उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव होतो, हे फळ सोडियमची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते आणि उष्माघाताचा धोका कमी होतो
जर रक्तदाब अनियंत्रित असेल, तर आंब्याचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, तो आपल्याला विविध आजारांपासून संरक्षण देतो, तसेच तो मुतखड्याच्या त्रासावरही उपाय मानला जातो
आंब्यामध्ये असणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, ते दृष्टी सुधारण्यासाठी मदत करते
हाडे मजबूत ठेवण्यासाठी आंबा खाणे फायदेशीर ठरू शकते, आंब्यामध्ये असलेली विविध पोषक तत्त्वे हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात
आंब्यातील व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन शरीरात कोलेजन निर्मिती मदत करतात, यामुळे त्वचेचा निस्तेजपणा कमी होऊन ती तजेलदार राहते
आंब्यामधील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे शरीराला विविध आजारांपासून संरक्षण मिळते, यामुळे कोणत्याही अतिरिक्त सप्लिमेंट्सविना आंबा नैसर्गिकरित्या तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतो
आंब्यातून शरीराला फोलेट, व्हिटॅमिन ए आणि सी मिळते, जे केसांच्या वाढीस पोषण देण्यास मदत करतात आणि केस मजबूत राहतात