sandeep Shirguppe
अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत.
अळीवात लोह, कॅल्शियम, जीवनसत्व ” क” आहे. अळीवामध्ये ॲंटिऑक्सिडंट्स असतात.
रक्त शुद्धी करणारे गुण आहेत. अळीवाचे सेवन हे तरूणांनी करणे फायदेमंद आहे.
बाळंतिनिला दूध वाढण्यासाठी अळीवाचे लाडू किंवा खीर सेवन करायला देतात.
अळीव भिजत घालून त्याला मोड आणून सॅलडमध्ये घालून सेवन केल्यास डोळ्याचे आरोग्य उत्तम राहते.
अळीव हे चिकट असतात त्याच्या सेवनाने मळविरोधाची तक्रार कमी होते.
अळीवमध्ये आयर्न भरपूर प्रमाण आहे. ह्याच्या सेवनाने रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
अळीवाच्या सेवनाने त्वचा चमकदार होते. वाढत्या वया बरोबर शरीरावर सुरकुत्या येतात कमी होण्यास मदत होते.