Deepak Bhandigare
मटारला हिरवा वाटाणा असेही म्हटले जाते, त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते
मटारमध्ये असे काही गुणधर्म असतात जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात, यामुळे हृदय निरोगी राहते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर मटार हा तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे, त्यातील उच्च फायबरमुळे पचन सुधारते आणि तुमचे आतडेही स्वच्छ राहू शकते
मटारमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण अधिक असते, तर फॅट कमी असते, त्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे राहून अतिखाणे टाळता येऊ शकते
मटारमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते, जे त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते
मटारचा आहारात समावेश केल्याने चेहऱ्यावरील सुरकूत्या दूर होऊन त्वचा चमकदार होण्यास मदत होते
प्रथिनांनी समृद्ध असलेले मटार खाल्ल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते
भाजी, पुलाव, सूप अशा विविध पदार्थांच्या माध्यमातून मटारचा आहारात समावेश करु शकता