Deepak Bhandigare
गाजरांमध्ये भरपूर प्रमाणात कॅरोटीन असते, जे शरीरात जाऊन 'व्हिटॅमिन ए' म्हणून रूपांतरित होते, यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते
गाजरांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे बद्धकोष्ठता, अपचनासारख्या समस्या दूर करते, ते आतडे स्वच्छ ठेवण्यासही उपयुक्त ठरते
गाजरातील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते
गाजर खाल्ल्याने त्वचा उजळण्यासाठी मदत होते आणि केसही मजबूत होतात, गाजरातील व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘ए’ त्वचेच्या पेशींना पोषण देतात
गाजरांमध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात, यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार दूर राहतात
गाजरांत कॅलरीज कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक कमी लागेत, म्हणूनच, ते वजन कमी करण्यास उपयुक्त आहे
गाजरांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन के १ हे शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते
कॅरोटिनॉइड्सने समृद्ध गाजरांचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो