sandeep Shirguppe
आपल्या आहारात तुपाला भरपूर महत्व आहे. आयुर्वेदात तुपाचे महत्व असल्याने तज्ज्ञ तूप खाण्याचा सल्ला देतात.
तुपात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत होते.
तुम्हाला वारंवार सर्दी आणि ताप येत असेल तर रोज एक चमचा तूप खाल्ल्यास या आजारांवर मात करता येईल.
तुपात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के तसेच ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, ज्यामुळे दाहक-एलर्जीच्या समस्या कमी होतात.
पचनासाठी तूप उत्तम मानले जाते. तूप खाल्ल्याने आतड्यात निरोगी बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते, जे पचनास मदत करतात.
मळमळ आणि बद्धकोष्ठता यासारख्या अपचनाच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास देखील हे उपयुक्त आहे.
तुपाच्या सेवनाने तुमची चयापचय क्रिया वाढते आणि शरीरातील खराब चरबी निघून जाते.
तूप हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. थंडीत त्वचेवर तूप लावल्यास त्वचेच्या आतून आणि बाहेरून आर्द्रता प्रदान करण्यास मदत होते.