Mahesh Gaikwad
पोषण तत्त्वांनी भरपूर असा सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
चवीने परिपूर्ण असल्यामुळे विविध पदार्थ आणि मिठाईमध्ये चव वाढविण्यासाठी ड्रायफ्रूट्सचा वापर केला जातो.
खारीक हाही ड्रायफ्रूट्सचाच एक प्रकार आहे. यामध्ये असणाऱ्या पोषण तत्त्वांमुळे याला पोषणाचे पॉवरहाऊसही म्हणतात.
दररोज खारीक खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूपच लाभदायक आहे.
खजूरच्या सेवनामुळे तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय अल्झायमरसारख्या मेंदूशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो.
यामध्ये फायबर घटक भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. बध्दकोष्ठतेसारख्या पचनाच्या समस्यांमध्ये खारीक खाणे फायदेशीर असते.
खारीक खाण्याने इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि आतड्यातून ग्लुकोज शोषणे कमी होते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
खारीक विविध प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन रोखण्यासाठी मदत करते. तसेच याच्या सेवनामुळे शरीराला उर्जा मिळते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.