sandeep Shirguppe
सुक्या मेव्यात खजुराला अत्यंत महत्व दुधासोबत रोज चार खजूरे खाल्ल्यास आपल्या शरिरात लोहाचे प्रमाण वाढते.
खजुराचे सेवन वारंवार केल्यास त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या दूर होतात.
मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए आणि तांबे यांचा उत्तम स्रोत म्हणजे खजूर असे आयुर्वेदात म्हटले आहे.
खजूर एक कप दूध मिक्सरमध्ये बारीक करावे त्यानंतर या पेस्टमध्ये एक चमचा मध, चमचा रवा मिसळा हा स्क्रब चेहऱ्याला वापरा.
खजुरातील पोषक गुणधर्मांमध्ये हृदय मजबूत आणि निरोगी बनवण्याचे सामर्थ्य आहे.
कोलेस्टेरॉलची वाढती पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खजूर एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
कॅलरी कमी आणि फायबर खजुरात जास्त असते त्यामुळे याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी काही खजूर पाण्यात भिजवून सकाळी खा, यामुळे तुमची चयापचय क्रिया व्यवस्थित होईल.
दररोज चार खजूर खाल्ल्यास याचा मन स्थिर ठेवण्यासाठी फायदा होतो. मेंदूचा विकास आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहते.