sandeep Shirguppe
आरोग्य चांगले राखण्यासाठी दही-भात खाणे फायद्याचे आहे.
दक्षिण भारत अथवा कोकणातील लोकांचा दही भात हा सर्वाधिक जवळचा पदार्थ आहे.
वजन कमी करण्यासाठी तसंच हाडांना मजबूती मिळण्यासाठीही दही भात खाण्याचा सल्ला दिला जातो.
दह्यातील आढळणाऱ्या प्रोबायोटिकमुळे पचनक्रिया अधिक चांगली होते.
दही -भात खाल्ल्याने मासिक पाळीपूर्वी पोटात येणाऱ्या कळा आणि पोटातील त्रास कमी होण्यास मदत मिळते.
दह्यातील असणारे प्रोबायोटिक्स तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत करते.
डाएटिशियनच्या म्हणण्याप्रमाणे दह्यामुळे मनावरील तणाव दूर होण्यास मदत मिळते.
दही भात हे शरीरातील उष्णता कमी करून तापमान कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते.