sandeep Shirguppe
हरभरा, मेथी आणि पालक सोबत चाकवतची भाजी अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
हिवाळ्यात या हिरव्या भाज्यांची मागणी वाढते. रायता, पराठा किंवा तुमच्या आवडत्या डाळीत घालून याचे सेवन केले जाते.
चाकवत भाजीत फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
चाकवत भाजीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आतड्यांमध्ये साचलेली घाण देखील साफ करते.
भाजीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पचनक्रियाही चांगली राहते.
चाकवत भाजी खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि इतर पाचन समस्या दूर होते.
केसांची वाढ होण्यासाठी आणि शरीरातील पेशी वाढण्यासाठी चाकवतची भाजी नक्की खावी.
चाकवत पालेभाजीत कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील असतात जे हाडे मजबूत करतात.