Black Sesame Benefits : काळे तीळामध्ये आहे आरोग्याचा खजिना ; फायदे ऐकून आवाक व्हाल

Mahesh Gaikwad

तीळाचे प्रकार

साधारणपणे तीळाचे दोन प्रकार आहेत, एक काळे आणि दुसरे पांढरे तीळ. पोषक तत्त्वांनी भरपूर असलेले तीळ आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतात.

Black Sesame Benefits | Agrowon

पोषक तत्त्व

या दोन्ही प्रकारच्या तीळांमध्ये पोषक तत्त्व भरपूर असतात. यातील काळ्या तीळामध्ये कॅल्शियम, फायबर, लोह, फॉस्फरस यांसारखे पोषक घटक आढळतात. जे शरीरासाठी आवश्यक असतात.

Black Sesame Benefits | Agrowon

आहारात तीळाचा वापर

आपल्या दैनंदिन आहारामध्ये तीळाचा वापर केल्यास पचनक्रियेसह केस आणि त्वचेलाही त्याची खूप फायदा होतो. जाणून घेवूयात काळ्या तीळाचे आरोग्यदायी फायदे.

जुनाट आजार

काळे तीळ हे अँटीऑक्सिडंटने समृध्द असतात. जे अनेक आजारांपासूनआपला बचाव करते. काळ्या तीळाचा आहारात समावेश केल्यास जुनाट आजारांचा धोका कमी होतो.

Black Sesame Benefits | Agrowon

ह्रदयविकार

काळ्या तीळातील पोषक घटकांमुळे मधुमेह, कर्करोग आणि ह्रदयविकार कमी करण्यास मदत करतात.

Black Sesame Benefits | Agrowon

कोलेस्ट्रॉल

काळ्या तिळात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स पुरेशा प्रमाणात आढळतात. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात .

Black Sesame Benefits | Agrowon

पचनक्रिया

काळ्या तिळामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. यामुळे पचनाची क्रिया सुलभ होते. पचनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी काळे तीळ रामबाण उपाय आहे .

रोगप्रतिकार शक्ती

पोषक तत्त्वांनी भरपूर असलेले काळे तीळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. ज्यामुळे अनेक प्रकारच्या संक्रमण आणि आजार टाळू शकता.

Black Sesame Benefits | Agrowon

निरोगी यकृत

काळ्या तीळाचा आहारात समावेश केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे यकृतही निरोगी राहते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Black Sesame Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....