sandeep Shirguppe
पांढरे मीठ खाल्ल्याने अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून सध्या काळ्या मीठाचा वापर प्रत्येक घराघरात केला जातो.
काळे मीठ खाल्ल्यास वजन कमी होते तसेच पचनाशी संबंधित समस्या कमी होतात.
गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. तर छातीत जळजळ नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे.
काळ्या मिठात सोडीयम कमी असल्याने त्याचा वापर जेवणात केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
काळ्या मिठामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे पायांची सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
काळे मीठ असलेल्या कोमट पाण्यात पाय भिजवल्याने वेदना आणि टाचांच्या भेगा यापासून आराम मिळतो.
ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी काळे मीठ फायदेशीर ठरू शकते. त्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
काळ्या मिठात अनेक प्रकारचे पोषक आणि खनिजे मुबलक असतात. याच्या रोज सेवनाने हाडे मजबूत होतात.
काळ्या मिठात कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.