Mahesh Gaikwad
कारल्याच्या भाजीचं नाव काढले तरी अनेकजण नाक मुरडतात. पण कारले आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असते.
कारल्यामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे दररोज कारल्याची भाजी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
आज आम्ही तुम्हाला दरोरज कारले खाल्ल्याने आरोग्यासंबंधित काय काय फायदे होतात याची माहिती सांगणार आहोत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कारल्याची भाजीच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रूग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने कारल्याची भाजी खाऊ शकतात.
कारल्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असते. अशात कारल्याची भाजी दरोरज खाल्ल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
याशिवाय कारल्यामध्ये आढळणाऱ्या पोटॅशिअममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही मदत होते. तसेच ह्रदयासंबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.
कारल्यातील पोषक घटकांमुळे पचनाच्या संबंधित समस्यांमध्ये आराम मिळण्यास मदत होते. याची भाजी खाल्ल्ल्याने बध्दकोष्ठ, अपचन, पित्ताच्या समस्येपासून आराम मिळतो.
कारल्यामध्ये आढळणाऱ्या 'व्हिटामिन-सी'मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.