Mahesh Gaikwad
भारतामध्ये प्राचीन काळापासून आयुर्वेदीक उपचार पध्दतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. अनेक लोकांचा अॅलोपॅथीपेक्षा आयुर्वेदीक उपचारांवर भर असतो.
आयुर्वेदामध्ये झाडपाला, झाडाची साल, मुळ्या यांचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. परंतु आपल्या दैनंदिन जेवणातील भाज्याही आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
कारले ही सुध्दा अशीच एक भाजी आहे, जी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आज आपण कारल्याचे आरोग्यासंबंधी फायदे पाहणार आहोत.
कारले चवीला कडू असल्याने याची भाजी कोणी आवडीने खात नाही. कारल्याची भाजी ताटात आली की, अनेकांची नाकं मुरडतात.
पण कारल्याची भाजी डायबिटीजच्या रुग्णांसाठी संजीवनीपेक्षा कमी नाही.
रक्तातील साखरेची पातळी कमी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याची भाजी फारच उपयुक्त आहे.
तसेच शरीरातील रक्त शुध्दीकरणासाठीही कारले फायदेशीर आहे. तसेच बध्दकोष्ठ, पचनाच्या समस्यांमध्येही कारले गुणकारी आहे.