Anuradha Vipat
रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते .
'रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा' ही म्हण आरोग्याच्या दृष्टीने अगदी खरी आहे.
सफरचंदामध्ये फायबर, विटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
सफरचंदातील विरघळणारे फायबर रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.
यातील पोटॅशियम रक्तवाहिन्यांना आराम देते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो .
यातील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन घटवणे सोपे होते.
यातील अँटी-ऑक्सिडंट्स इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात, ज्यामुळे टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी होतो.