Benefits Ajwain : ओव्या चूर्णमुळे शरिरातील हनिकारक तत्वे येतील बाहेर

sandeep Shirguppe

ओवा खाण्याचे फायदे

ओवा खाल्याने शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर पडतात. कफ निघून जाण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो.

Benefits Ajwain | agrowon

कोमट पाणी आणि ओवा

मासिक पाळीत पोट आणि कंबर दुखू लागल्यास ओवा तव्यावर गरम करून कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरीत आराम मिळतो.

Benefits Ajwain | agrowon

चूर्ण खाल्ल्यास आराम

ओवा, काळे मीठ, आणि सुंठ एकत्र करून त्याचे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रास लगेच कमी होतो.

Benefits Ajwain | agrowon

दम्याचा त्रास थांबतो

ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे दम्याच्या त्रासापासून नक्कीच आराम मिळू शकतो.

Benefits Ajwain | agrowon

वजन कमी होण्यास मदत

एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजवून सकाळी पाण्यात एक चमचा मध घालून पाणी रिकाम्या पोटी प्यावे.

Benefits Ajwain | agrowon

गुडघ्यावर रामबाण उपाय

गुडघे दुखत असल्यास ओवा गरम करावा आणि तो एका रुमालात बांधून घेऊन त्याने गुडघ्यांना शेक द्यावा. त्यामुळे गुडघ्यांना आराम मिळतो.

Benefits Ajwain | agrowon

सांधेदुखी थांबेल

सांधेदुखीचा त्रास होत असल्यास ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास चांगला आराम मिळतो.

Benefits Ajwain | agrowon

खोकल्यावर उपाय

सतत खोकला येत असेल पाण्यामध्ये ओवा घालून उकळून घ्यावे. नंतर थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे.

Benefits Ajwain | agrowon

ताप आल्यास काढा घ्या

ताप आल्यास ओवा आणि दालचिनी टाकलेला काढा प्या. ज्यामुळे तुम्हाला बरं वाटू लागेल.

Benefits Ajwain | agrowon