sandeep Shirguppe
आपल्या शरिरात पाण्याची कमतरता असेल तर अनेक समस्या जाणवतात, पाण्याचे शरिरासाठी महत्व आहे.
पण पाणी पिण्याची वेळ योग्य असेल तर आपल्या अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार रोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरिराला आरोग्यदायी फायदे होतात.
जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आपल्या शरीराला पाण्याची अत्याधिक गरज असते. यावेळी किमान ५०० मिली पाणी प्यावे.
सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. यामुळे रक्त स्वच्छ होतं.
जपानी मेडिकल सिस्टीमनुसार, रिकाम्या पोटी सकाळी पाणी प्यायल्याने डोके दुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार कमी होतात.
सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म सक्रिय होतो. त्यामुळे वजन कमी करण्यातही तुम्हाला मदत मिळते.
सकाळी उठून पाणी प्यायल्याने गळा, मासिक पाळी, डोळे, लघवी आणि किडनीसंबंधी समस्या कमी होतात.