Aslam Abdul Shanedivan
हळद आणि काळी मिरी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात असतात. जे जेवणाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्यालाही अनेक फायदे देते.
हळद आणि काळी मिरी दोन्ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून हळदीत अँटीऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल अढळतात.
काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी६, थायमिन आणि पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स या सारखे घटक असतात.
सकाळी रिकाम्या पोटी हळद आणि काळी मिरी पाण्याचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
सकाळी रिकाम्या पोटी हळद आणि काळ्या मिरीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.
हळद आणि काळी मिरी पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील वेदना, सांधेदुखीप आणि सूज यापासून आराम मिळतो.
हळद आणि काळी मिरी हे पाणी शरीराचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
हळद आणि काळी मिरी पाण्याच्या सेवनाने इंसुलिनची संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.