sandeep Shirguppe
खजूरासोबत तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. खजूर आणि तूप हे अंत्यत पौष्टिक खाद्य आहेत.
खजुरात व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि विटॅमिन सी असते. ते तुपात मिसळून खाल्ल्याने ऊर्जा मिळते.
नेहमीच पोट फुगण्याचा किंवा अपचनाची समस्या असणाऱ्यांसाठी खजूर आणि तूप खाणे उपयोगाचे आहे.
अॅनिमिया झाल्यास डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात. याने शरीराला पुरेसे लोह मिळते.
खजुर आणि तुपात पोटॅशियमचे असते. सोबतच यामध्ये सोडियमदेखील आढळते. यामुळे मज्जासंस्थेला फायदा होतो.
खजूर दूध आणि तूप यांच्या मिश्रणाचा शेक करून पिल्यास शरिराचा थकवा कमी होतो.
खजुर मिक्सरमध्ये बारीक करून सुका मेवा आणि खसखस थोडी भाजून तूप घालून बर्फी केल्यास अनेक फायदे होतात.
तुपात रात्रभर खजूर भिजवून ठेवून खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.